आबु रोड येथे ब्रह्माकुमारी मीडिया प्रभाग तर्फे राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन


आबू रोड (राजस्थान) : शांतिवन कॅम्पस येथे मीडिया विंगच्या सौजन्याने राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. हा महासम्मेलन दिनांक 26 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे.

या वर्षीच्या महासम्मेलनाचा विषय आहे – “समाजात शांती, एकता आणि विश्वास प्रस्थापित करण्यासाठी माध्यमांची भूमिका” (Role of Media for Promoting Peace, Unity & Trust in Society).

या परिषदेत देशभरातून माध्यम क्षेत्राशी संबंधित विविध प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये वृत्तपत्र व मासिकांचे मालक, प्रकाशक, संपादक व संवाददाता, रेडिओ व टीव्ही चॅनेल्सचे सीईओ, डायरेक्टर, कार्यक्रम अधिकारी व पत्रकार, माहिती मंत्रालयाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, न्यूज एजन्सीचे प्रतिनिधी, मीडिया प्राध्यापक व विद्यार्थी, लेखक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट निर्माता, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, सोशल मीडिया तज्ज्ञ, पब्लिकेशन व प्रिंटिंग प्रेस प्रतिनिधी, चित्रपटगृह संचालक, केबल ऑपरेटर तसेच टपाल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

या महासम्मेलनात अंदाजे 1500 मीडियाकर्मी  सहभागी होणार आहेत. मीडिया प्रतिनिधी सोबत त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले) देखील सहभागी होऊ शकतील.

परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी आपल्या स्थानिक ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात संपर्क साधावा  असे आवाहन डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग माऊंट आबू यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم