कॉलेज ऑफ मेनेजमेंट द्वारा भव्य रोजगार मेळावा संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: कॉलेज ऑफ मेनेजमेंट द्वारा १० सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणाच्या कक्षेत उच्च शिक्षणाचा अंतर्भाव असल्याने विद्यार्थ्याला अध्ययन,अध्यापन आणि संशोधन एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला संस्कृतीने वाढवावे हा शिक्षणाचा मूळ दृष्टीकोन आहे. उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर श्रम संस्काराचाही वर्षाव व्हावा या करिता कमवा आणि शिका या विचार धारेतून विद्यार्थ्यांकरिता भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला.
प्रो टेक इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदाकरिता जागा भरण्यात आल्या. या कंपनीच्या अकोला , वाशीम, बुलढाणा येथे विविध शाखा असून कंपन्यामध्ये रोजगारासाठी अनेक विद्यार्थी मुलाखतीकरिता आले. मुलाखतीतुन अनेक पदांकरिता उमेद्वानांची निवड करण्यात आली. यामध्ये ४० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यात विविध पदाकरिता भरती करण्यात आली. भरती करिता दहावी पास ते पदवीयुत्तर युवक युवती पात्र झाले. या मुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ,गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्यता झाली. विविध प्रकारचे कामे करून मिळणाऱ्या अनुभवाचा लाभ भविष्यात पद्न्नोती करिता होईल.
प्रो टेक इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड द्वारा घेण्यात आलेल्या मुलाखतीत कॉलेज ऑफ मेनेजमेंट खामगाव मधील अनेक विद्यार्थ्यानी देखिल सहभाग नोंदविला. कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत कॉलेज च्या अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली. या रोजगार मेळाव्यामुळे अनेक होतकरू उमेद्वाराना रोजगार प्राप्त झाला.
कॉलेज ऑफ मेनेजमेंट खामगावच्या वतीने प्रो टेक इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मनपूर्वक आभार मानले. भविष्यात असेच अनेक रोजगार मेळावे घेउन अनेकानेक होतकरू उमेद्वाराना रोजगार उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन कॉलेज ऑफ मेनेजमेंटचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी केले.
या रोजगार मेळाव्याच्या यशश्वीतेसाठी कॉलेज ऑफ मेनेजमेंटच्या उपप्राचार्य प्रा. कोमल मन्नी समवेत कॉलेजचे प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment