किर्तनातून पत्रकार गाडेकर यांना वाहिली आदरांजली
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - आयुष्यात जगताना लोक पैसे आहेत तोवर अवती भवती मधमाश्या सारखे चिकटतात नंतर मात्र विसरून जातात परमेश्वराने हा देह भजन पुजनासाठी दिलेला आहे देवाचं त्यामुळे देवाचं नामस्मरण केले पाहिजे आणि संगत गुण चांगला असला पाहिजे मेल्यानंतर प्रत्येकाला स्मशानात जावे लागते त्यामुळे हा नर देह राहील असे नाही त्यामुळे जीवंत आहे तोवर परमार्थ करा असे मत भागवतकार ह भ प राम महाराज गाडेकर यांनी आपल्या हरिकिर्तनातून व्यक्त केले.
![]() |
| नर देह राहील असे नाही त्यामुळे जीवंत आहे तोवर परमार्थ करा -ह भ प राम महाराज गाडेकर |
ते दि 25 सप्टेंबर रोजी जेष्ठ दिवंगत पत्रकार भोजराज गाडेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित किर्तनात सवडद येथील सिध्दविनायक संस्थानच्या प्रांगणात बोलत होते.
ग्रामीण पत्रकारितेला नवे आयाम बहाल करणारे जेष्ठ पत्रकार भोजराज गाडेकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. यावेळी या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह भ प राम महाराज यांनी आपल्या किर्तनातून भोजराज गाडेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले की, आताचा सत्तरीतला माणूस आयुष्याचा अनेक चढउतारातुन तावून सुलाखुन निघालेला असल्यामुळे त्याला आताचा काळ स्विकारणे थोडे कठीण जात आहे. काही बांडगूळ चापलूस पणा करून जगतात परंतु त्यांचा जगण्याला तितकासा अर्थ सुध्दा नसतो. आजकालच्या अधुनिकतेकडे वळलेल्या पिढीला काय माहित आहे तो पडझडीचा पहिला काळ? त्या काळातील काही मोजके शहरे सोडली तर इतरत्र ग्रामीणता आढळायची पैशाला तेव्हढं काही महत्त्व नव्हतं. पण प्रत्येकजण माणुसकी जपायचा.खेडे वजा गावातील परिस्थीती हि तर खूप हलाखीची होती. तेथील जमिनदार सोडला तर प्रत्येकजण मोलमंजुरी करून जगायचे.
![]() |
| जिल्ह्यातील व्यवसायिकांना जाहिरातींसाठी परवडेल असे एकमेव पोर्टल म्हणजे जनोपचार |
तेथील कारागीर कुंभार, लोहार, न्हावी, सुतार, सालदार यांना तर सालचंदी मिळायची अन त्यावरच त्यांचा उदारनिर्वाह व्हायचा घर ही झोपड्याचीचं होती. अशा परिस्थितीत भोजराज गाडेकर यांचा सवडद या गावी जन्म झाला. आठरापगड दारिद्र्य त्यांनी आपल्या आई - वडीलांच्या सानिध्यात भोगलं. त्या वेळेमध्ये मायबाप म्हणजे अत्यंत इमानदार लोक त्यांनी पैशासाठी आपला स्वाभिमान कधीच सोडला नाही.. अशा स्वाभिमानी माय बापाच्या सानिध्यातील गेलेला काळ हा भोजराज भाऊ यांना निश्चितच प्रेरणादायीच ठरला प्रत्येक अडचणीत आपल्यालाच का पोळून निघाव लागत ह्या ज्वलंतप्रश्नामुळे त्यांचा तारुण्यपणात त्यांना अन्याया विरुध्द लढण्याची जिद्द निर्माण झाली. शिक्षणातुन मिळालेल्या लेखनीला त्यांनी आपले शस्त्र बनवले. भाऊंनी लिहलेले निवेदने, विनंती अर्ज, कैफियत हे पुढील अधिकाऱ्याला विचार करण्यास भाग पाडायची. त्यावर त्यांना काहीतरी मार्ग काढावा लागत असे भाऊचा स्वभाव हा आई वडीलांच्या पुण्याईने संवेदनशील व सहकार्याचा होता. आपल्या अॅटोच्या व्यवसायातून त्यांचा उदारहनिर्वाह चालायचा. परंतु त्या तुटपुंज्या व्यवसायातून सुध्दा ते अनेकांना मदत करायचे. प्रत्येकाच्या सुख दुःखात तन मन धनाने हजर असायचे. या स्वभाव गुणाच्या प्रभावाने भाऊचं नाव हे पंचकृषीत गाजत राहलं. गावात व गावाच्या अवतीभवती त्यांचा मोठा गोतावळा तयार झाला या नेतृत्व गुणातूनच भाऊ हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी बांधील झाले. त्या काळातील शिवसेना ही प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणे हे ब्रिद वाक्य घेऊनच चालत होती. व कफल्लक भाऊचा हा तर नांदच होता. भाऊ कट्टर शिवसैनिक बनले. हे सर्व सुरु असतांना आपलं स्वतःचं एकवलय असाव या हेतुने भाऊनी आपल्या लेखनीला पत्रकारीतुन चालना दिली व स्वतःच विदर्भ न्याय हे साप्ताहिक सुरु केलं. जनसामान्याचा आवाज हा शासन दरबारी पोहचवला. अनेक आंदोलने केली अन्यायाला वाचा फोडली.
यानंतर रात्री गुरूदेव सेवा भजनी मंडळ वाकोडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली खंजरी भजनातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख, सरपंच गजानन देशमुख, ह भ प वैभव मानतकर, हभप ज्ञानेश्वर महाराज गाडेकर, ह भ प अर्चना गाडेकर, सोपान खंडारे, आयुष महाराज, दत्तात्रय गाडगे, भीमराव काळे, सर्जेराव देशमुख, वैजनाथ राऊत, जगन्नाथ राऊत, दत्तात्रय देशमुख, शोभाताई राऊत, विलास आंभोरे, सौ संगीता गणेश डोईफोडे, गजानन देशमुख, उपस्थित होते.


إرسال تعليق