आजोबांची स्वप्नपूर्ती...रिद्धी झाली डॉक्टर
बीएएमएस परीक्षेत कु.रिद्धी पारसेवार चे सुयश
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स द्वारा घेण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षेत (बी ए एम एस) येथील जय गजानन ऑप्टिकलचे संचालक संतोष पारसेवार यांची मुलगी कु. रिद्धी हिने ७६२ गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. नागपूर येथील गव्हर्मेंट आयुर्वेद महाविद्यालयातून तिने हे यश संपादित केले आहे. कु. रिद्धी पारसेवार हिचे आजोबा उत्तमराव बाबुराव पारसेवार यांची नातीला डॉक्टर बनवण्याची इच्छा तिने आज पूर्ण केली. जनोपचार परिवाराकडून डॉ.रिद्धी दीदीचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

إرسال تعليق