पूरग्रस्तांसाठी अभिनव मोहिम....
सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पूरग्रस्त नागरिकांसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम व सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये भावना निर्माण व्हावी यासाठी सदैव अग्रेसर असतात. त्याप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा या भागातील अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे तातडीची मदतीची आवश्यकता निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा या भागातील पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदत करण्यासाठी दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोजी एक मदत पेटी तयार करून सर्व विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले व तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षिकेतर कर्मचारी यांना सुद्धा विनंती करून या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी , तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे, डॉ. पी. व्ही. पिंगळे , क्रीडा व शारीरिक विभागाचे प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग प्राध्यापक वर्ग प्राध्यापकेतर कर्मचारी अशा सर्वांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर व तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अँड. आकाश दादा फुंडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment