श्री सदगुरू श्रीधर महाराज संस्थान तथा मॉ भारती प्रतिष्ठाण च्या सुसंस्कार व व्यक्तीमत्व विकास शिबिराला सुरुवात 

   जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- श्री सदगुरू श्रीधर महाराज संस्थान तथा मॉ भारती प्रतिष्ठाण च्या सुसंस्कार व व्यक्तीमत्व विकास शिबिराला आज पासून श्री सदगुरू श्रीधर महाराज संस्थान, श्री चोपडे यांच्या मळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात हभप श्री अंबादास महाराज, हभप श्री गोकुळ महाराज,विहिंप जील्हापालक श्री बापुसाहेब करंदीकर, जील्हामंंत्री व योग शिक्षक श्री राजेंद्रसिंह राजपूत,हिन्दुसेवक ॲड अमोल अंधारे,श्री नामदेव महाराज, मॉ  भारती प्रतिष्ठाण चे ॲड संजय कुमार बडगुजर,अनिल गवई,सचिन चांदुरकर,श्याम पाटिल, सुरेश सावरे, गौतम पंडा, अतुल माडीवाले यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

सुसंस्कार वर्गात कचऱ्यातून कलेचे गिरविल्या जात आहेत  धडे!
भक्तीगीत भावगीत आणि सिने गीतांना टाकाऊ वस्तु पासून मधुर संगीताची साथ 

बच्चे कंपनी रंगली अनोख्या भाव विश्वात


   हे शिबिर दि 30 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 07 ते 09 वाजेपर्यंत वारकरी भवन, श्री चोपडे यांच्या मळ्यात होणार असुन यामध्ये योग प्राणायाम, सुसंस्कार,जीवनात सकारात्मकता येण्यासाठी संतविभुतींचे मार्गदर्शन , विविध पारंपरिक खेळ इ चा समावेश आहे

   तसेच 30 ऑक्टोबर सकाळी 11.00 वा सर्व पालकांसाठी हभप आचार्य श्री हरीभाऊ वेरुळकर महाराज(श्री गुरुदेव सेवाश्रम,नांदुरा) यांचे कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तरी  सर्व विद्यार्थी, तसेच नागरीक बंधुभगिनी यांनी या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

संपर्क- 9860548188,7972912001,9423057274,9890686277,9922444315

Post a Comment

أحدث أقدم