लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे एक अनोखी दिवाळी
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क: यावर्षी सुध्दा लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवने स्थानिक निवासी मूकबधीर शाळेत शिकणाऱ्या सुमारे १८५ दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळीच्या भेटवस्तू दिल्या. तसेच मुलांना मिठाई व नाश्त्याचे पॅकेट वाटण्यात आले. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनाही मिठाई देण्यात आली. प्रकल्प प्रमुख सरिता अग्रवाल, लॉ. दिव्या अग्रवाल, लॉ. उज्वला उमरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लॉयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष पीएमजेएफ लॉ. आकाश अग्रवाल यांनी लॉयन्स क्लब परिवाराच्या वतीने भविष्यात अशी सेवा देत राहण्याची प्रतिज्ञा केली, वरील बातमी डिस्ट्रीक्ट पीआरओ एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.




إرسال تعليق