चांदमारी भागात "कही खुशी कभी गम"
 ऐन दिवाळीत पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांमध्ये चिंता


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील मोठा प्रभाग असलेल्या चांदमारी फैलातील काही भागात पाणीपुरवठा झाला आहे मात्र गेल्या वीस दिवसापासून उर्वरित भागाला पाणीपुरवठा झाला नसताना कही खुशी कभ गम असे वातावरण निर्माण झाले आहे. चांदयामारी भागात येत असलेल्या लक्ष्मी नगर, माखरिया मैदान शेगाव नाका आदी भागात गेल्या वीस दिवसापासून नळाला पाणी येत नाही. शासकीय रुग्णालयाजवळ फुटलेल्या पाईपलाईनमुळे हा पाणीपुरवठा निष्क्रिय झाल्याचे समोर आले असले तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करून नागरिकांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم