“वॉक फॉर युनिटी” उपक्रमात नव संकल्प फाउंडेशनचा सहभाग!
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुलढाणा पोलिस दल व लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी “वॉक फॉर युनिटी” हा उपक्रम खामगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान, खामगाव येथून जलंब रोड मार्गे ५ किलोमीटर अंतर पार करून पुन्हा त्याच ठिकाणी वॉकथॉनची सांगता झाली.
या उपक्रमात नव संकल्प फाउंडेशनच्या सदस्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवून “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांद्वारे समाजात एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
कार्यक्रमात पोलीस दलाचे अधिकारी, नगर परिषद कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकता, बंधुता आणि देशभक्तीचा संदेश समाजात पोहोचला.


إرسال تعليق