जगदंबा मिरवणुक असल्याने एका गुरुवारचा बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- खामगांव शहरामध्ये दिनांक १६/१०/२०२५ रोजी श्री. जगदंबा देवी विसर्जन होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून खामगांव शहरामध्ये दिनांक १६.१०.२०२५ रोज गुरुवार या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत असून सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्यात यावा. बाजार आणि यात्रा कायदा १८६२ च्या कलम ५ अन्वये जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जाहीर केले आहे.

إرسال تعليق