सरन्यायाधिश भुषणजी गवई यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा खामगाव वकील संघाने नोंदविला निषेध
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- महाराष्ट्राचे सुपुत्र व भारत देशाचे सरन्यायाधिश भुषणजी गवई यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा खामगाव वकील संघाने आज निषेध नोंदविला. दि 06/10/2025 रोजी न्यायालयीन कामकाज करीत असतांना राकेश किशोर नावाचे व्यक्तीने त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला .या घटनेचा देशातील सर्व स्तरातुन तिव्र निषेध करण्यात आला.सदर भ्याड हल्ल्याचे प्रभानाचे अनुबंधाने देशातील जनसमुदायाचे भावना अत्यंत तीव्र होऊन निषेध नोंदविण्यात आला . बार कॉन्सील ऑफ महा. अन्ड गोवा यांचे निर्देशानुसार खामगांव वकील संघातर्फ आज दि 7/10/2025 रोजी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून सदर ईसमावर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी असा एकमताने ठराव पारीत करण्यात आला .त्यावेळी खामगांव वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत लाहुडकर सचिव जयंत पाटील उपाध्यक्ष रमेश भट्टड, तथा सर्व पदाधिकारी, सदस्य हजर होते.

إرسال تعليق