नागपुर येथे आयोजीत श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नियोजन बैठक संपन्न!
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव : श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनाच्या दिशेने एक भव्य आणि प्रेरणादायी बैठक खामगांव येथील श्री संत तुकाराम महाराज सभागृहात संपन्न झाली.
सदर दि. 26 ऑक्टो. 2025 रोजीच्या समस्त अखील भारतीय शिंपी परिवाराच्या समाजहित संबंधी प्रचार व जनजागृती हेतू बैठकीला महासंमेलनाचे मुख्य संयोजक ईश्वरराव धिरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ किटे, आयोजन समिती विदर्भ अध्यक्ष गुणवंतभाऊ वाकरे अकोला, सुरेशराव मानपुत्र, अॅड. अमोल डहाके, डॉ. अरविंद चौधरी, राजेश जोध सर, प्रमोद आगरकर, सोनाजी आगरकर, रविंद्र भांबुरकर, रविकांत हुरपुडे, शशिकांत गोटे यांचेसह अनेक मान्यवर ऊपस्थीत होते.
बैठकीचे प्रास्ताविक राजूभाऊ आगरकर यांनी केले. त्यानंतर मुख्य संयोजक श्री ईश्वरराव धिरडे यांनी संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आवश्यकता, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर माहिती दिली. गुणवंतभाऊ वाकरे अकोला यांनी खामगांव व परिसरातील समाजबांधवांना या महासंमेलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष राजुभाऊ किटे यांनी मतभेद विसरून एकत्र यावे अशी विनंती केली.
तसेच सुरेशभाऊ मानपुत्र यांनी शिंपी पोटजाती विसरून एकत्र येऊन महासंमेलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले. अॅड. अमोल डहाके, डॉ. अरविंद चौधरी यांनी सुद्धा सभेला मागदर्शन केले.

إرسال تعليق