गो. से. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वन्यजीव सप्ताहानिमित्य ‘ज्ञानगंगा अभयारण्य’ येथे ‘जंगल ट्रेल’
श्रमदानातुन केली पाणवठ्याची दुरुस्ती
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- स्थानिक गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव येथील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ ऑक्टोबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान "वन्यजीव सप्ताह -२०२५' प्राणिशात्र विभागप्रमुख डॉ. जी. बी. काळे व वनस्पतीशात्र विभागप्रमुख डॉ. ए. व्ही. पडघन यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सप्ताहाचा एक भाग म्हणून दि ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘ज्ञानगंगा अभयारण्य’ येथे सुमारे ८० विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि १० शिक्षक मिळून 'जंगल ट्रेल'तयार करण्यात आली होती .तत्पूर्वी अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्वांची सकाळीच नोंद घेण्यात आली. भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांनी सुमारे ७ते ८ किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण केले. विद्यार्थ्यांना जंगलातीलकिडे, स्पायडर्स, मधमाशी,ड्रॅगनफ्लाय,कीटक, पशुपक्षी,फुलपाखरे , साप तसेच नीलगाई यांचे सुद्धा दर्शन झाले. तदनंतर विद्यार्थ्यांनी गेरू माटरगाव-पलढग या प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता मोहीम राबवून तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावली .
शिक्षकांनी सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याने प्लास्टिक कॅरी बॅग किंवा त्यामधील अन्न पदार्थ सोबत आणले नव्हते हे उल्लेखनीय. मध्यान्ह भोजनानंतर विध्यार्थ्यानी अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवील पाणवठा युक्त ओढयातील बंधाऱ्याची दुरुस्ती केली. त्याकरिता पोत्यांमध्ये माती भरून ,छोटी मोठे दगड, काडी -कचरा वापरून भराव टाकण्यात आला व उभारलेल्या भिंतीचे मजबुतीकरण करण्यात आले. तसेच 'नक्षत्र वन' येथे मुख्यद्वारासमोरील पर्यटकांकडून टाकण्यात आलेल्या कचरा, पाणी बॉटल, प्लास्टिक, कॅरीबॅग, खाद्यपदार्थांचे रॅपर्स इत्यादींची स्वच्छता केली. सहलीच्या समारोपीय कार्यक्रमाला सर्वश्री एच. व्ही. डिवरे,राजपूत साहेब ,वनपाल बोथा वर्तुळ; एस. आर. भालेराव , एन. बी. उबरहंडे , वनरक्षक बोथा बिट; तसेच कर्मचारी सर्वश्री अमित शेख , परमेश्वर, हरिभाऊ, विनोद, मंगेश, सुनील, दयाराम, महादेव साबळे इ. उपस्थित होते. दरम्यान डॉ. जी. बी. काळे यांनी सांगितले की, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यात वन्यजीवांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. हे अभयारण्य दिवसेंदिवस साकारात्मक रित्या बदलत आहे .अभयारण्याच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९७ पासून येथील विकासाचा आलेख उंचावणारा आहे . आपन सर्वांनी आपल्या अभयारण्या बद्दल स्वाभिमान बाळगणे गरजेचे आहे.डॉ. ए. व्ही. पडघन यांनी सांगितले की, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही स्वयंसेवी संस्था तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आजची ही सहल संपन्न होत आहे.त्यांद्वारे वन्यजीवांचे महत्त्व तरुण पिढीच्या ध्यानात यावे आणि ते वन्यजीव संवर्धनासाठी अधिक सजग व्हावेत, हा प्रयत्न असतो. श्री एस. आर. भालेराव, वनरक्षक बोथा सर्कल, यांनी सांगितले कि , वन्यजीव सप्ताह आणि अभयारण्य बद्द्लची माहिती समाजात पोहचावी त्याबद्दल ची माहिती व्हावी. शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था कार्यशाळा, यांच्याद्वारे राबविण्यात येणारे चर्चासत्रे आणि निसर्ग पथनाट्य ज्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण होत असते. "युवा पिढीला वन्यजीवांबद्दल शिक्षित करणे भविष्यातील संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नव्यानेच सुरू झालेल्या शॉपिंग सेंटरला भेट देऊन टी-शर्ट, जॅकेट, कीचॆन, पुनर्वापर करता येणारी पाणी बॉटल,कॅप्स आदींची खरेदी केली. दरम्यान विद्यार्थिनी कु. साक्षी कावणे, अंकिता कोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सप्ताहाचे समन्वयक डॉ जी. बी. काळे यांनी श्री दीपेश लोखंडे वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव वन्यजीव यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव बोबडे, सचिव डॉ. प्रशांत बोबडे, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. सहलीच्या यशस्वितेकरिता समन्वयक डॉ. जी. बी. काळे, डॉ. ए. व्ही. पडघन, गणित विभागातील प्रा सचिन शिंगणे, प्रा मयूर नप्ते, तसेच जीवशास्त्र विभागातील प्रा मनोज बाभळे, प्रा. अनिकेत वानखडे, प्रा. रंगनाथ ठोबरे, प्रा. मुकिंदा सपकाळ, प्रा. कु. नैना मिश्रा, प्रा.ज्ञानेश्वर गायगोळ आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.


إرسال تعليق