लॉयन्सच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे ५ ऑक्टोबरला वितरण
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव : लॉयन्स क्लब व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवार दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
बाराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राथमिक ग्रामीण विभागातून कु. अस्मिता विठ्ठलराव क्षिरसागर, सहा. अध्यापिका (जि.प. मराठी उच्च प्राथ. शाळा, सुनगांव, ता. जळगांव जा.), प्राथमिक शहरी विभागातून सौ. अंजली प्रविण क्षिरसागर, सहा. शिक्षिका (लोकमान्य बाळगंगाधर टिळक न.प. मराठी प्राथ. शाळा क्र ६, खामगांव), माध्यमिक शहरी विभागातून डॉ. फकीरा भगवान राजगुरु, विषय शिक्षक (जि.प. मराठी उच प्राथ. शाळा, पिंप्री माळी, ता. मेहकर), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. देविदास सिताराम वले, सहा. अध्यापक (नवजीवन विद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा), अंध, अपंग, कर्णबधीर व आदिवासी विभागातून डॉ. प्रकाश रामभाऊ जगताप, मुख्याध्यापक व वाचा उपचार तज्ञ (निवासी मुकबधीर विद्यालय, खामगांव), सेवानृिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणाऱ्या सौ. लता ओंकारसिंग राजपुत, सेवानिवृत्त अध्यापक (सावित्रीबाई फुले माध्य. विद्यालय, सिंदखेड राजा), वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. लक्ष्मण फुलचंद शिराळे, सहयोगी प्राध्यापक (विदर्भमहाविद्यालय, बुलडाणा) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमास प्रमुख पाहुणे मा. प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. अश्विनजी बाजोरिया, प्रमुख अतिथी मा.श्री. सुधाकरजी अजवे गुरुजी (अध्यक्ष, टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगांव), प्रकल्प प्रमुख व लॉयन्सचे माजी प्रांतपाल एमजेएफ लॉ.डॉ. अशोक बावस्कर, झोन चेअरपर्सन लॉ.डॉ. सागर अग्रवाल तसेच लॉयन्स क्लब खामगांवचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
अशी माहिती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लबचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.


Post a Comment