गो. से. महाविद्यालय खामगांव येथे भारतरत्न स्व. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन संपन्न

 


खामगांव :- आज दि. १५/१०/२०२५ सकाळी ११ वाजता गो.से. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन कक्षा मध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. मनोज पाठक प्रकाशक, वर्णमुद्रा प्रकाशन, शेगाव हे लाभले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. तळवणकर यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत केले. 


कार्यक्रमाला ग्रंथालय सल्लागार समितीचे  समन्वयक  प्रा. डॉ. पी.पी. ठाकुर, तसेच सदस्य प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड, प्रा. डॉ. व्ही. एस. अठवार, सहाय्यक ग्रंथपाल श्री. एस.जी. गुळभेले, उपस्थित होते. मा. मनोज पाठक यांनी वर्णमुद्रा प्रकाशनाचे बहुमूल्य व वाचनीय असे ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिले. तसेच गो.से. महाविद्यालयातील सेवानिवृत्त राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा टावरी यांनी दरवर्षी प्रमाणे सलग चवथ्या वर्षीही ग्रंथालयाला १० हजार रुपायांची ग्रंथ संपदा भेट दिली. त्याबद्दल मा. प्राचार्य व ग्रंथालय समितीने वरील मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मावळे, श्री.मेटे, श्री.सुरवाडे, श्री.वानखडे, कु. कीर्तीमाला टिकार यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post