अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करामध्ये १०० टक्के शास्ती मिळावी 

 गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाची मागणी ; नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन 


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव प: अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करामध्ये १०० टक्के शास्ती मिळावी या मागणीसाठी नागर परिषद मुख्याधिकारी यांना गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने १५ ऑक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात नमूद आहे की खामगाव नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्ता धारकाकडे नगरपालिकेच्या कराचा भरणा थकीत झाला आहे. थकीत रकमेवर शास्ती दंड लावण्यात येतो. मात्र शासनाने थकीत मालमत्ता करा वरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्सानात्मक अभय योजना सुरू केली आहे. 

त्या अनुषंगाने खामगाव नगर परिषद हद्दीतील ८४७  मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करून ५० टक्के शास्तीची,दंडाची रक्कम देखील भरणा केली आहे आणि नगर परिषदेमार्फत पूर्ण झालेला अभय योजनेचा अर्ज भरून दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे अभय योजनेअंतर्गत करा मध्ये अंशता माफी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. वास्तविक शासन निर्णयानुसार एकत्रित मालमत्ता करावरील शास्ती ५० टक्के पेक्षा अधिक माफ करावयाचे झाल्यास  प्रस्ताव नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झालेले दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या वतीने पुढे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनाय यांच्याकडे वरील प्रस्ताव सादर केलेले दिसत नाहीत. त्यामुळे नगर परिषदेने ८४८  मालमत्ता धारकांच्या एकत्रित मालमत्ता कारावरील शास्ती ५० टक्के पेक्षा अधिक माफ करावयाचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांची सही आहे. निवेदन देताना गणेशभाऊ चौकसे, प्रकाश शेठ अग्रवाल काकाजी, भीमाभाऊ वासकर,दीपक महाजन आदी उपस्थित होते.l 




Post a Comment

أحدث أقدم