वॉक फॉर युनिटीमध्ये खामगावात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता खामगाव येथे पोलीस विभाग व लायन्स क्लब यांच्या वतीने वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात नगरपरिषद कर्मचारी, विविध अकॅडमी खामगाव, सीनियर सिटीजन ग्रुप, योगा ग्रुप खामगाव,करिअर कट्टा ग्रुप, नव संकल्प ग्रुप खामगाव व इतर खामगाव येथील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिक वकील संघ,अकॅडमीचे विद्यार्थी, व इतर सर्व नागरिकांना अपर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



إرسال تعليق