जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर चा विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद 

विद्यार्थांची पारले कंपनीला शैक्षणिक भेट खामगाव: ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तत्पर असलेल्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी खामगाव येथील सुप्रसिद्ध असलेल्या पारले- जी बिस्कीटचे उत्पादन करणार्‍या शिवांगी ब्रेकर्स कंपनीला शैक्षणिक भेट देण्यात देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना चित्र फित द्वारे कंपनी बद्दल माहिती देण्यात आली. 

तसेच बिस्कीट व चॉकलेट कसे बनवतात या बद्दल भेट व माहिती व्यवस्थापक श्री आशिष होणाळे सर  यांनी स्पष्टीकरण दिले व नंतर प्रत्यक्ष बिस्कीट बनवताना दाखवण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना कंपनी मार्फत बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बौद्धिशीय संस्थेच्या सचिवा प्रा सुरेखा गुंजकर मॅडम तसेच जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर चे प्राचार्य श्री रवींद्रजी मांडवेकर व उप मुख्याध्यापक संतोष जीअल्हाट सर सोबत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या शैक्षणिक सहली मध्ये नर्सरी ते चौथ्या वर्गातील 200 विद्यार्थी सहभागी होते त्यांनी बिस्किट उत्पादनाच्या माहिती सोबतच मनसोक्त आनंद लुटला. अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे



Post a Comment

أحدث أقدم