बुलडाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावे - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांची मागणी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव प्रतिनिधी: बुलडाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत हजारो प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पंतप्रधान यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी पाठविले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, उज्वला गॅस योजना भारत सरकारची एक सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेची सुरुवात १ मे २०१६ रोजी आपण सुरु केली. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत. तरी अद्यापपावेतो अर्जाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. सन २०२५-२६ मध्ये २५ लाख अतिरिक्त नविन परिवारांना उज्वला गॅस योजने अंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची घोषणा आपण केली आहे. बुलडाणा जिल्हा हा मागास जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नाहीत. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येत आहेत. २०१६ ते २०२५ या दरम्यान प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
तरी बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन तत्काळ प्रलंबित अर्ज मार्गी काढून उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात यावा गणेश चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती हरदिपसिंग पुरी मंत्री पेट्रोलियम प्राकृतिक गॅस मंत्रालय,महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,अजित पवार उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मकरंद पाटील पालकमंत्री, जिल्हाधिकारी बुलडाणा, बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांना पाठविण्यात आल्या आहेत.l फोटो - गणेशभाऊ चौकसे

إرسال تعليق