शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या: शिराळा,पाळा,वझर,झोळगा गणेशपुर च्या शेतकऱ्यांसह राजेंद्र बघे पोहोचले SDO कार्यालयात 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व शिराळा,पाळा,वझर,झोळगा गणेशपुर,सह खामगांव तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी घेऊन शिव सेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र बघे हे शेतकरी मित्रांसोबत आज sdo कार्यालयात धडकले. तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल  असा इशाराही दिला.

अशा आहेत मागण्या१) त्वरित पंचनामे करून खामगांव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.२) आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन मदत करावी.३) मागील वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे खरडून गेलेल्या जमिनीचा अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही ते लवकर लवकर मिळावी४) हुमणी अळी व येलो मोजॅक रोगामुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.५)सातत्यपूर्ण पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य मदत द्यावी.

यावेळी उपस्थित- शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे, सूचना उपतालुकाप्रमुख संतोष सातव,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे,उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाळे,उप तालुकाप्रमुख माधुरीताई गवई युती शहर प्रमुख श्वेता ताई म्हसाळ पाटील, उपतालुकाप्रमुख  कल्पनाताई गायगोळ,तोताराम गावंडे, विलास हागारे,सागर सारंगधर वाघ,नारायण टिकार,रामकृष्ण वसतकार, दत्ता वडकार,सुरेश सूर्यवंशी, शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णू कदम,सागर चव्हाण उपतालुकाप्रमुख प्रवीण पाटील धामोडे,निवृत्ती धामोडे,प्रभाकर बघे,ज्ञानेश्वर बघे,चेतन शलकर,गणेश बघे, सुनील बोदळे,सुजित चिकटे,सचिन पवार,गणेश बघे,निलेश बरदिया,गणेश अग्रवाल,संजय घाडगे, मारुती जगताप प्रभू होंगे धम्मपाल गवई आदी सह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم