लायन्स क्लब खामगाव संस्कृतीकडून 200 चिमुकल्यांसोबत बाल दिन उत्साहात साजरा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव प्रतिनिधी: लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी लायन्स ज्ञानपीठ स्कूल, खामगाव येथे राष्ट्रीय 'बाल दिन समारंभ' मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. 'सेवा से जुड़ें, जीवन जिएँ' या ब्रीदवाक्याला अनुसरून क्लबने हा सेवा प्रकल्प यशस्वी केला, ज्याचा लाभ सुमारे 200 शालेय विद्यार्थ्यांना झाला.या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट्स आणि बिस्किटे वाटण्यात आली. खाऊ मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद क्लबच्या सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
हा केवळ एक प्रकल्प नसून, सेवाभावाची भावना मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर क्षण असल्याचे क्लबच्या सदस्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला क्लबचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये क्लबचे अध्यक्ष PMJF Ln. आकाश अग्रवाल, सचिव Ln. डॉ. निशांत मुखिया आणि सदस्य Ln. रवींद्र सिंह बग्गा यांचा समावेश होता. त्यांनी स्वतः उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. क्लबने यापुढेही समाजोपयोगी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही दिली आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
>


إرسال تعليق