जिल्हास्तरीय अविष्कार-2025 स्पर्धेत सिद्धिविनायक च्या विद्यार्थ्यांचा गौरव
जनोपचार न्यूज नेटवर्क शेगाव : स्थानिक सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथील विद्यार्थी राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय *अविष्कार-2025* संशोधन स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये पोस्टर सादरीकरण स्पर्धा आणि प्रकल्प प्रदर्शनी अशा विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय सहभागी होत असतात आणि विद्यार्थ्यांच्या सूप्त कलागुणांना वाव मिळतो.
महाविद्यालयातर्फे AI AND DS विभागातील गोकुळ बगाडे व हर्षल भुरे यांनी कृषी व पशुसंवर्धन या विभागात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या अभिनव संशोधन कार्याचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
याच स्पर्धेत कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील एम. हुजैफा व सैय्यद काशिफ यांनी *कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ* या विभागात तृतीय क्रमांक मिळवत आणखी एक यशाची नोंद केली.
स्पर्धेतील या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनंत जी.कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या चमू सोबत विभाग प्रमुख प्रा योगेश काटोले व प्रा वैष्णवी राठी होते. विद्यार्थ्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर दादा फुंडकर आणि उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना. ऍड श्री आकाश दादा फुंडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment