सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे ‘संविधान दिन’ उत्साहात 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचलित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा मोठ्या उत्साहात यशस्वी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष  सागर फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, रचना, मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची माहिती असणे या मुख्य उद्देशाखाली विविध उपक्रम व कार्यक्रम पार पडत असतात. त्याप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी आणि तंत्रनिकेतन प्राचार्य प्रा. प्रीती चोपडे, डॉ. पी. व्हि. पिंगळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधानाला हार फुले अर्पण आणि दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. 

त्यानंतर प्रा. राजश्री जाधव यांनी अभ्यासपूर्वक सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, इतिहास व उद्देश यांची संपूर्ण माहिती दिली. विद्यार्थी प्रतिनिधीतून कु.प्रिती माळी व त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये असे उद्गार काढले की,आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे भारतीय संविधान. हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर देशाच्या प्रगतीची दिशा दाखवणारा मार्गदर्शक आहे. त्यानंतर आजच्या या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातून एनपीटीईएल ऑनलाइन शिक्षण कोर्स यामध्ये उत्तीर्ण झालेले प्राध्यापकांमधून डॉ. अनंत जी. कुलकर्णी, प्रा. सागर सोनोने, प्रा. योगेश काटोले, प्रा. श्रद्धा कडुकार व विद्यार्थीमधून कु. पल्लवी घनोकार, आशिष शर्मा यांचा गुण गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा पारसकर व आभार प्रदर्शन कु. समीक्षा जावरकर यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर सोनोने, प्रा. माधुरी क्षीरसागर, क्रीडा व शारीरिक विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच सर्व विद्यार्थी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर व तसेच संस्थेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अँड. आकाश दादा फुंडकर यांनी कौतुक करून आणि शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post