खामगावात सेंद्रिय (ऑरगॅनिक) शेतमाल विक्री केंद्र शुभारंभ
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- सह्याद्री ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. अंतर्गत खामगांव येथे ग्राहकांसाठी सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. ग्राहकांना रसायनमुक्त भाजीपाला, फुड्स कडधान्ये, दाळी, खाद्यतेल, मिळावे या उद्देशाने सदर विक्री केंद्र सुरु करण्यात आले.
जे शेतकरी शेंद्रीय शेती करतात अश्या शेतकरी बांधवांना कंपनी चे अध्यक्ष श्री. भगवानराव बरडे यांनी मालविक्रीसाठी नांदुरा रोड, मुक्तानंद नगर खामगाव येथे जागा उपलब्ध करून दिली. प्रत्येक आठवड्याचे गुरवार व रविवार ला शेतकरी बांधवांनी आपला माल तेथे विक्रीसाठी आणावा. सदर विक्री केंद्राचे उद्घाटन श्री. दादासाहेब कवीश्वर (अध्यक्ष पंचशील होमिओपॅथी खामगाव) यांनी केले तर प्रमुख अतिथी श्री. बाबासाहेब व्यवहारे (उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव) श्री. सुनिलजी पवार (तालुका कृषी अधिकारी साहेब) श्री. कुवरसिंहरजी मोहने (जेविक शेतीतज्ञ व मार्गदर्शक ) श्री. डिंगाबरजी महाले, श्री. शरदभाऊ वसतकार, श्री. राजेशजी झापर्डे उपस्थित होते, श्री जनार्दनजी हैंड, श्री मनजीतसिंगजी, कार्यक्रमाचे संचालन श्री. मयुरजी बरडे तर आभार प्रदर्शन सौ. शितल दुकानदार यांनी केले कार्यक्रमासाठी नामदेव जगताप, नागेश पाटील, पंकज राजे, प्रकाश मोरे, सिध्दांत देशमुख, अनिल मेहरे, संकेत कळसकार, राजेंद्र देशमुख, संध्या इंगळे, मानिकराव सातव, शुभांगी कोचुरे, ओमप्रकाश खत्री, विकास सावरकर, सचिन कोकाटे, विनायक महाले, भावेश रामसे, योगेश पवार, वैष्णवी सांगे, कल्याणी चाकरे, जयेश जयलवाल, यांनी परीश्रम घेतले.


Post a Comment