राज्यस्तरीय आदर्श गुणीजन रत्न जीवन गौरव पुरस्काराने जगदीश अग्रवाल सन्मानित

 खामगाव: महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई व मराठी भाषा विभाग मुंबई तथा तरुणाई फाउंडेशन कुटासा आणि श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 रोजी सातव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


 या वैचारिक सोहळ्यामध्ये खामगाव येथील ज्येष्ठ संपादक लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख जगदीश अग्रवाल यांना त्यांच्या मागील 35 वर्षांची समाजाभिमुख पत्रकारिता, सामाजिक व पत्रकार कल्याण आणि आरोग्य क्षेत्रातून सामाजिक सेवा त्यांच्या या सेवाभावी वाटचालीबद्दल त्यांना "गुणीजन रत्न जीवन गौरव" या राज्यस्तरीय पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.


 या संमेलनाचे उद्घाटक श्रीपाद अपराजित, अध्यक्षस्थानी सु.पू. अढाऊकर, प्रमुख अतिथी बारोमासकर, डॉ. सदानंद देशमुख, स्वागताध्यक्ष म्हणून लोकस्वातंत्र्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, सिने अभिनेता कुणाल मेश्राम, देवकाताई देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रा. संजय पोहरे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, प्रा. डॉ. गणेश मेनकार,  प्रा. दिपाली सोसे, प्रा. संतोष हुसे,  तरुणाईचे संदीप देशमुख, आदींची विचार मंचावर उपस्थिती लाभली होती.

 कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार, साहित्यिक, कवीगण आणि समाजसेवी व्यक्तींची चांगलीच उपस्थिती लाभली होती. जगदीश अग्रवाल यांचे सोबत खामगाव वरून सागर मोदी, पंजाबराव देशमुख, मोरखडे सर, अरविंद देशमुख (नागपुर), रामराव देशमुख, फारुक सर, संभाजीराव टाले आदि पत्रकार बंधू उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم