सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे इंटेलेच्युअल  प्रॉपर्टी राईट्स अँड पेटन्ट्स अँड डिझाईन फिलीन्ग कार्यशाळा संपन्न 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस  येथे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर दादा फुंडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध तांत्रिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.   परंपरेनुसार महाविद्यालयात   इंटेलेच्युअल  प्रॉपर्टी राईट्स अँड पेटन्ट्स अँड डिझाईन फिलीन्ग या विषयावर  कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर  कार्यक्रम दिनांक २० नोव्हेंबर रोजी ११.00 वाजता महाविद्यालयामध्ये ऑनलाइन घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत . कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून संशोधनावर वर भर देण्याचे मार्गदर्शन केले. 

महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) द्वारे   आयोजित या कार्यक्रमाला  मुख्य अतिथी म्हणून डॉ. भारत एन . सुर्यवंशी, सहाय्यक नियंत्रक (पेटंट आणि डिझाइन ), राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था ,नागपूर  हे  उपस्थित होते .त्यानंतर वक्त्याचा परिचय झाला.त्यांनी या कार्यशाळेत नवनवीन अविष्कार , औद्योगिक रचना ,ट्रेडमार्क यांचे कायदेशीर संरक्षण  या विषयी माहिती  वक्त्याने बौद्धिक संपत्तीचे प्रकार उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांनी बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्याचे महत्त्व आणि त्याचा संस्थेच्या आर्थिक वाढीवर कसा परिणाम होतो हे सांगितले. त्यांनी भारत आणि जगभरातील आयपी नोंदणी प्रक्रियेबद्दल वर्णन केले आणि प्रत्येक आयपीच्या संरक्षणाचा कालावधी देखील सूचीबद्ध केला. वक्त्याने श्रोत्यांना प्रश्न विचारून संवादात्मक सत्र आयोजित केले. शेवटी त्यांनी भारतातील आयपीचे संरक्षण करण्याचे देशाचे ध्येय सादर केले. सत्रानंतर, वक्त्याने श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रा. मयुरी मोरे  यांच्या आभारप्रदर्शनाने सत्राचा शेवट झाला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयाचे इनोवेशन सेल चे प्रमुख प्रा. मयुरी मोरे ,प्रा.स्वप्नील महाजन ,प्रा. माधुरी क्षीरसागर, प्रा. इफत रहमान ,प्रा. वैष्णवी राठी, प्रा. अंजली हागे यांनी   केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर दादा फुंडकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश दादा फुंडकर यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व आयोजक टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

أحدث أقدم