खामगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट व पाहणी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :-२८ दि. (उमाका) खामगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. २८ नोंव्हेबर रोजी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी ईव्हीएम सिलिंग कक्षाला भेट दिली व सुरक्षा कक्षाची पाहणी केली.
यावेळ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. सुनिल पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी न. प. खामगाव डॉ प्रशांत शेळके, निवडणूक निरीक्षक सुधिर खंबायत, उपजिल्हाधिकारी कल्पेश तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, नायब तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार अभिजीत जोशी, नायब तहसिलदार निखिल पाटील, नायब तहसिलदार सोनाली भाकरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment