चर्चा तर होणारच........!

बायको उमेदवार... पण खरी सूत्रे नवऱ्याच्या हातात?


स्थानिक निवडणुकांच्या प्रचाराला आता गती येत असून पुन्हा एकदा 'प्रतिनिधी' आणि 'खरे सत्ताधारी' यांचा जुना मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना प्रचारात पुढे करण्यात आले असले तरी, खरी सूत्रे मात्र त्यांच्या नवऱ्यांच्यच हाती असल्याची चिऊ चिऊ मतदारांमध्ये आहे.अनेक मतदारसंघात महिलांचा राजकीय सहभाग वाढावा म्हणून महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली.

परंतु अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी फक्त पत्नीच्या नावावर असून निर्णय, प्रचार धोरण, निधी नियोजनाच्या रूप रेखा नवरेच आखतान दिसत आहे. त्यामुळे "खरे प्रतिनिधित्व कोणाचे?" असा सवाल सर्व सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतो आहे. काही ठिकाणी महिला उमेदवार स्वतःला राजकीय अनुभव नाही म्हणून बाजूला ठेवत असून पूर्ण मोहिमेचा बोजा पतीवर सोपवतात. परिणामी, निवडून आल्यावरदेखील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी महिला प्रतिनिधी कमी पडतात. काही ठिकाणी तर नवऱ्यांवरच 'अनधिकृत लोकप्रतिनिधी' असल्याचा आरोप होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, महिला खरोखरच पुढे येऊन प्रभागाचा विकास, समस्या, तक्रारी यांचा अभ्यास करून निर्णय घेत असतील तरच आरक्षणाचा हेतू पूर्ण होईल. अन्यथा, बायको उमेदवार आणि नवरा संचालक हीच विकृत राजकीय संस्कृती कायम राहील. स्थानिक स्तरावर याबाबत चर्चा वाढली असून, "उमेदवार कोण? आणि सत्ता कोण चालवणार?" हा प्रश्न मतदार आपापसात चर्चा करू लागले आहेt.

Post a Comment

Previous Post Next Post