दहावी च्या मित्र मैत्रिणींच्या "गेट टुगेदर" कार्यक्रमातून झालेल्या ओळखीतू झाले विवाहितेचे आयुष्य बर्बाद ! 

चॅटिंग पतीला दाखविण्याची धमकी देवून केला ३७ वर्षीय विवाहितेवर अत्याचार!!



खामगाव -दहावी च्या मित्र मैत्रिणींच्या गेट टुगेदर कार्यक्रमातून झालेल्या ओळखीमुळे एका ३७ वर्षीय विवाहितेचे आयुष्य बर्बाद झाले. कारण भेटलेल्या त्याने व्हॉटसअपवरील चॅटिंग पतीला दाखविण्याची धमकी देवून सदर विवाहितेशी ५ वेळा नको ते संबंध प्रस्थापित केले. तो इतक्यावरच थांबनाही तर त्याने पीडित विवाहितेला चेटींग फोटो, व्हीडीओ पतीला पाठविण्याची धमकी देत तिच्या जवळून ६४ हजार रुपये देखील उकळले. तो धमकी देत असल्याने त्रस्त झालेल्या विवाहितेने मोठी हिम्मत करुन ही बाब पतीला सांगितली, तरी देखील त्याची लालसा कमी झाली नाही. त्याने पीडितेच्या पतीला देखील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून चार लाख रुपये मागितले. 

जाहिरात

अखेर याबाबत पीडितेने खामगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून त्यावरुन पोलिसांनी शैलेंद्रसिंग रा. जलंब याच्याविरुरुध्द कलम ६४(१), ६४(२) (३)३०८ (२),७७.७८(१) ३३३ भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post