![]() |
| जाहिरात |
खामगावचे राजोरे यांना पत्रकारितेची पीएच. डी.
दैनिक दैशोन्नतीच्या बुलडाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक श्री राजेशजी राजोरे (खामगाव) यांना जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पत्रकारितेतील पीएच. डी. पदवी बहाल केली आहे. अशी उपाधी मिळविणारे ते वऱ्हाडातील पहिले पत्रकार ठरले आहेत.
"देशोन्नतीचे संपादक श्री प्रकाशभाऊ पोहरे यांच्या 'प्रहार' स्तंभातील लिखाणाचा सामाजिक आशय : एक चिकित्सक अभ्यास" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. पोहरे यांचा हा स्तंभ गेली 30 वर्षे सातत्याने सुरू असून, त्यातील 1260 लेखांचा परामर्श राजोरे यांनी आपल्या प्रबंधात घेतला आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखनावरील ही पहिलीच पीएच. डी. आहे. यासाठी त्यांना प्रा. डॉ. सुधीर भटकर यांचे मार्गदर्शन लाभले. राजोरे गेली 41 वर्षे पत्रकारितेत आहेत.
पीएच. डी. मिळविणारे पहिले वैदर्भीय पत्रकार डॉ. राजू मिश्रा यांच्या शोधप्रबंधाचीही त्यांना मदत झाली. तो प्रबंध राजोरे यांनी काल नागपुरात येऊन मिश्रा यांना परत केला आणि त्यांचेे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख हेही उपस्थित होते.


Post a Comment