रोहन बामनेट चा हददपार प्रस्ताव मंजुर
खामगाव: रोहन संजय बामनेट वय २२ वर्ष रा. बाळापुर फैल खामगाव यांचे विरुध्द हददपार प्रस्ताव क्र १४/२०२५ कलम ५६ १ (अ) (ब) प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी खामगाव जि. बुलढाणा यांचे कार्यालयात मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी सा खामगाव जि. बुलढाणा यांचे कार्यालयीन आदेश क्र फौप्रक्र/मुपोका ५६ /खामगाव/१६/२०२५ प्रमाणे मंजुर झाला असुन आज दिनांक २५/११/२०२५ रोजी रोहन संजय बामनेट वय २२ वर्ष रा. बाळापुर फैल खामगाव यास ३ महीण्यासाठी खामगाव उपविभागाच्या हददीतुन (खामगाव व शेगाव संपुर्ण तालुक्यातुन) बाहेर निघुन जावे अशा आदेशाची अंमलबजावणी त्याला हददपार करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब बुलढाणा, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब खामगाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा, खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली मा पोनी श्री रामकृष्ण पवार सा, सपोनि पाटील Psi खांबलकर, पोहेकॉ अरुण हेलोडे, प्रदीप मोठे, संतोष गायकवाड , नापोकॉ सागर भगत, पोकों रविंद्र कन्नर, राम धामोडे, गणेश कोल्हे, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव, निशांत कळसकर पो का संघशील निकाळजे यांनी केली आहे.

إرسال تعليق