आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेत कु. वैष्णवी कु. प्रज्ञा व  कु शारदा या योगपटूचे उत्कृष्ट सादरीकरण 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :  योगपटू कु. वैष्णवी राजू सपकाळ कु. प्रज्ञा विनोद काकड कु शारदा संतोष डोंगरे यांनी राळेगाव येथे झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेत आपल्या योगासनांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून  बुलढाणा जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.कु. प्रज्ञा विनोद काकड हिने आपल्या उत्कृष्ट योग कलेच्या  सादरीकरणा ने सर्वांचे मने जिंकली आहे. या तिन्ही योगपटूंचे सर्वत्र कौतुक केले आहे . अशी माहिती प्रा सीमा देशमुख यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post