सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या दोन दिवसीय वधू-वर मेळावा थाटात 


Janoochar, प्रतिनिधी - समाजात वधू-वरांच्या अपेक्षा जास्त वाढले आहे. त्यामुळे उपवर आणि वधूंनी जिवनसाथी निवडतांना तडजोड करणे गरजेचे आहे. समाजात अनेक युवक आणि युवती लग्नाचे वय झालेले असतांनाही योग्य जोडीदार मिळत नसल्याने अद्यापही जोडीदाराच्या शोधात आहे. त्यामुळे मुला-मुलींनी अपेक्षा बाजूला ठेवून तडजोड करून आपला साथीदार निवडावा. असे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी 9 नोव्हेंबर रोजी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित उपवर वधूंच्या पालकांना मार्गदर्शन करतांना केले.

         सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट पुणे आणि सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज खामगाव, शेगाव यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील वधू-वर परिचय मेळाव्याचे श्री संत नगरी शेगाव येथील गणेश प्रस्थ येथे करण्यात आले होते. यावेळी 9 नोव्हेंबर रोजी समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहून उपवर वधूंच्या पालकांना मार्गदर्शन करतांना आ. डॉ. संजय कुटे बोलत होते. यावेळी मंचावर यावेळी मंचावर प्रमोद बागलाने उद्घाटक, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश आहेर अध्यक्ष सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज सदस्य मंडळ ट्रस्ट पुणे, दिगंबर मानेकर मेळावा प्रमुख, अनुप गवळी अध्यक्ष खामगाव, निलेश मानेकर अध्यक्ष अमरावती, अनिल नवगिरे अध्यक्ष बुऱ्हानपूर, अजय गंगासागर परतवाडा, सुनील भालेराव अमरावती, सतीश सोनवणे नाशिक आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आ. डॉ. संजय कुटे म्हणाले की, जोडीदार निवडतांना अनेक मुलींकडून चांगली नौकरी, शेती, बंगला, गाडी अशा अनेक अपेक्षा करतात. त्यामुळे अनेकांचे वय जास्त झाल्यानंतरही जोडीदार मिळत नाही. काहींच्या अशा अपेक्षा पुर्ण झाल्या तरीही लग्न झाल्यानंतर काही दिवसातच अनेकांच्या संसाराचा काडीमोड होतो. मग अशावेळी आई वडीलांनी काय पाहून हा संबध जोडला जो काही दिवसातच मोडल्या गेला. असे न होऊ देता वधू-वरांच्या आई वडीलांनीही काही तडजोडी कराव्या आणि आपल्या मुलांची संसारे योग्य पध्दीतीने चालतील याची दक्षता घ्यावी. असेही आ. डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित उपवर वधूंच्या पालकांना मार्गदर्शकर करतांना म्हणाले. या दोन दिवसीय वधू-वर परिचय मेळाव्याचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमर विठ्ठलराव सोनवलकर अमरावती व अनुप गवळी अध्यक्ष खामगाव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज नितीन वानखेडे, नरेश खांडेकर, विजय तायवाडे नागपूर, जितेंद्र जाधव, अनिल नगरे, रजनीश चव्हाण, सुशांतराज घवाळकर, श्याम वानखेडे, पिंटू जाधव, महेंद्र बनसोड, सौरभ जाधव, राजू मोरे आदींनी परिश्रम घेतले.

 मेळाव्यात 705 उपवर वधूंनी दिला परिचय

सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या इतिहासात नोंद होईल असा 2 दिवसीय मेळावा शेगाव नगरीत पार पडला. सदर मेळाव्यात संपूर्ण विदर्भासह राज्यातील आणि बाहेर राज्यातून 705 उपवर वधूंनी नोंदणी करून दोन दिवसात परिचय दिला. तसेच या दोन दिवसीय मेळाव्याला सुमारे 6 हजार समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. याठिकाणी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट आणि सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज खामगाव, शेगावच्या आयोजन समितीकडून मेळाव्यासाठी आलेल्या समाज बांधवांसाठी जेवण, चहा, नास्ता आणि पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

أحدث أقدم