जय गजानन अँम्बीशन अकॅडमी तर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- तालुक्यातील 10 वि च्या विद्यार्थ्यांसाठी Smart Science Talent Test 2025 चे आयोजन करण्यात आले होते .या टेस्ट ला खामगाव तालुक्यातून 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. त्यातील पहिल्या 500 विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.गोतमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून खामगाव गट विकास अधिकारी (BDO) राजपूत व विस्तार अधिकारी धुके, केशवभाऊ पेसोळे, राठोड सर, ज्ञानेश्वर नवथळे सर , सुनीता राठी , मंडवाले मॅडम, प्रतीक्षा मॅडम, खेडकर सर, वानखेडे सर, गणेश राऊत सर, सोपान सर, शर्मा सर गोपाल खेडकर सर, चैतवानी सर, मोरे सर व संचालक नवथळे सरांचे वडील काशीनाथजी नवथळे सर व समाज निष्ठा संपादक वानखेडे मॅम उपस्थित होते.
या टेस्ट मधून पहिली विद्यार्थीनी श्रवणी देशमुख ही असून तिला गणेशाची चांदी ची फ्रेम व 5000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.तर द्वितीय बक्षीस सिद्धी चव्हाण ही असून तिला चांदी ची फ्रेम व 4000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.तृतीय बक्षीय खुशी मोरे ही असून तिला चांदी ची फ्रेम व 3000 रक्कम देऊन गौरविण्यात आले.चौथे बक्षीस आकांशा देवकते ही असून तिला चांदी ची फ्रेम व 2000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.पाचवे बक्षीस राशी हटकर व रुचिका जुमळे हे असून याना प्रत्येकी चांदी ची फ्रेम व प्रत्येकी 1000 ₹ देऊन गौरविण्यात आले.
सोबतच प्रत्येक शाळेतील पहिल्या आलेल्या 50 विद्यार्थ्यांना बॅग व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.400 विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.अपघातात आपले पाय गमावलेला विद्यार्थी चेतन मोरे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरला. कठीण परिस्थितीत ही यशाचा मार्ग कसा शोधावा याचा आदर्श त्याने सर्वांसमोर दिला या करता BDO साहेब यांनी त्याचा सत्कार करून त्याचा गुणगौरव केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन नवथळे सरांनी केले प्रास्ताविक कुलकर्णी मॅडमनी केले
भावी वाटचाली करीता कुणाल देशमुख सर व शेंडे सरांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.वानखेडे सर, गणेश राऊत सर पेसोडे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आकर्षित केले व आपल्या भागातील सर्वत्तम क्लास म्हणून जय गजानन अँम्बीशन अकॅडमी खामगाव ला संबोधित केले
BDO साहेबांनी आपल्या भाषणामध्ये क्लास च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे गुणगान केले व भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्यात.या कार्यक्रमध्ये रोख रक्कम व भेटवस्तु च्या स्वरूपात तब्बल 111000 ₹ चे बक्षीस वितरण करण्यात आले.10 वि ला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 एप्रिल 2026 पासून फ्री ब्रिज कोर्स सुरू करण्यात येईल अशी माहिती क्लास चे संचालक गजानन नवथळे सर यांनी दिली.






إرسال تعليق