मतमोजणी पुढे ढकलल्याची अफवा
खामगाव शहरातील एकूण 35 वार्ड पैकी 31 वार्ड मध्ये निवडणुका 2 डिसेंबर रोजी निवडणुका होत असून त्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी स्थानिक महात्मा गांधी सभागृह प्रशासकीय इमारत जवळ खामगाव येथे होणार आहे.
निवडणूक आयोगाने शहरातील 5अ, 7अ, 9 ब, 16 ब , या ४ वार्डासाठी मतदान 20 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले असून त्यांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे.
परंतु शहरातील संपूर्ण वार्डाची मोजणी 21 डिसेंबरला होण्याची अफवा फार मोठ्या प्रमाणात शहरात पसरली आहे.
वास्तविक 31 वार्डाची मतमोजणी ही आधीच जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजीच होणार असून यासाठी खामगाव शहरातील नांदुरा व जलंब जाणारी वाहतूक जयपुर लांडे पुलावरून व शेगांव मार्गे वळविण्यात आली आहे.

إرسال تعليق