खामगाव शहर पोलिसांचा चांदमारी भागात छापा

प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी जित जगदीश गुप्ता (वय २५, रा. चांदमारी घरकुल परिसर, खामगाव) याच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान सुमारे २,५०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा आढळून आला. हा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी जित जगदीश गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक आर. एन. पवार, अरुण हेलोडे, संतोष इटमल्लू, राम धामोडे, निशांत कळसकार व प्रमोद बावस्कार यांनी केली.

जाहिरात

ठाणेदार पवार यांचे आवाहन.,

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाच वापर करू नये. नायलॉन मांजामुळे मानव, पशू आणि पक्ष्यांच्या जीविताला गंभीर धोक निर्माण होतो. तसेच पर्यावरणाच गंभीर हानी होते. नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल केले जातील.

Post a Comment

أحدث أقدم