नगरपरिषदेच्या अभियंत्यांच्या आशीर्वादाने शहरात निकृष्ट दर्जाची कामे सुरू? संबंधितांवर कार्य करा अन्यथा आंदोलन- अजय टप 

मलकापूर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही कामे मलकापूर नगरपरिषदेतील संबंधित अभियंत्यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

जाहिरात

रस्ते, नाल्या, सौंदर्यीकरण तसेच इतर सार्वजनिक कामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर, कामात नियमांचे उल्लंघन आणि अनेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन कामे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य चौकशी करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष या विषयावर ठोस भूमिका घेत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post