लॉयन्स क्लब खामगांव व्दारा आयोजित

डॉ. के. आर. पवार स्मृतिप्रित्यर्थ धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार जाहीर



जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- विश्वव्यापी सर्वोत्तम सेवाभावी संस्था लॉयन्स क्लबस् इंटरनॅशनलची स्थानिक शाखा लॉयन्स क्लब खामगांव संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासह खामगांव शहरात क्लबचे माध्यमातून समाजपयोगी प्रकल्प राबवित आहेत. लॉयन्स वर्ष २०२५-२६ मध्ये क्लब व्दारा विविध समाजपयोगी सेवाकार्य घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून लॉयन्स क्लब खामगांव व्दारा बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी डॉक्टरांचा स्व. लॉ. डॉ. के. आर. पवार यांचे स्मृतिप्रित्यर्थ 'धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 

हे या पुरस्काराचे व्दितीय वर्ष आहे. या पुरस्कारासाठी चार विभागातून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये स्पेशालिटी विभागातून डॉ. नारायण केडीया (खामगांव), एमबीबीएस विभागातून डॉ. विश्वास देशमुख (नांदुरा), बीएएमएस विभागातून डॉ. बळीराम वानखडे (नांदुरा) व होमिओपॅथी विभागातून डॉ दिलीप चौधरी (खामगांव) यांची निवड करण्यात आली आहे. यांचा चांदीचे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४ वा. स्थानिक न.प. लॉयन्य आय हॉस्पिटल, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे पार पडणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. उमाकांत चौधरी (रिजन चेअरपर्सन, रिजन-१), प्रमुख उपस्थिती लॉ.डॉ. अशोक बावस्कर (माजी प्रांतपाल प्रांत ३२३४ एच२), विशेष उपस्थिती डॉ. सागर अग्रवाल (झोन चेअरपर्सन झोन-१) व लॉ. डॉ. गिरिष पवार (प्रकल्प प्रमुख), क्लब अध्यक्ष लॉ. तुषार कमाणी, क्लब कोषाध्यक्ष लॉ. कुणाल भिसे हे उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती लॉयन्स क्लब चे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैसवाल, व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم