तरुणांची आवड राकेश राणा यांना सर्वाधिक मतदान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांना मिळालेल्या मतदानाबाबत आता निकालानंतर चर्चा रंगू लागल्या आहेत या निवडणुकीत भाजपाचे राकेश राणा यांना सर्वाधिक मतदान मिळाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक ११ ब चे भाजपाचे अधिकृत उमेदवार राठोड राकेश कुमार रमेश चंद्र उर्फ राकेश राणा यांना २०२२ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार आनंद किलोलिया यांना १०९१ मिळाली आहेत. त्यामुळे राकेश राणा यांचा ९३१ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना मिळालेली मते हे या निवडणुकीतीलइतर सर्व विजयी उमेदवारांपेक्षा सर्वाधिक आहेत.

Post a Comment