जि.प. माध्यमिक शाळा किन्ही महादेव येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
जनोपचार न्यूज नेटवर्क अनंता तोडेकर खामगांव तालुक्यातील किन्ही महादेव येथे इयत्ता १ली ते ८ वी पर्यंत वर्ग असुन गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यापासून येथील शाळेमध्ये मुख्याध्यापकासह ६ शिक्षक आहेत तसेच शाळेमध्ये ३ शिक्षकांची गरज आहे तसेच इयत्ता ८ वी वर्गाला इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नसुन विद्यार्थ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
या शिक्षकांची नेमणूक करण्याबाबतची तक्रार शाळा समिती आणि ग्रामस्थांकडून वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे करुनही त्यांनी कोणत्याही प्रकारची शिक्षकांची नेमणूक जिल्हा परिषद शाळा किन्ही महादेव येथे केली नाही. तरीही पुढील काही दिवसांत शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक न केल्यास शाळा समिती अध्यक्ष आणि सदस्यांकडून शाळेला कुलूप लाऊन आंदोलन करण्यात येईल आणि याची परिणामी जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा शाळा समिती अध्यक्ष तसेच सदस्य आणि ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

إرسال تعليق