गुंजकर कॉलेजमध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- गुंजकर कॉमर्स सायन्स अँड आर्ट कॉलेज आवार येथे आज क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा गुंजकर एज्युकेशन हब खामगाव चे अध्यक्ष प्रा रामकृष्ण गुंजकर सर यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी संस्थेच्या सचिवा प्रा सो गुंजकर मॅडम कॉलेजचे प्राचार्य सतीश जी रायबोले सर जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर चे प्राचार्य रवींद्र जी मांडवेकर सर तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक शिक्षक टीचिंग अँड नॉन टीचिंग कर्मचारी उपस्थित होते अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले भरपूर विद्यार्थी असे असतात की ते अभ्यासामध्ये कमी असतात परंतु वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवितात आजच्या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांच्या क्रिकेटच्या टूर्नामेंट आयोजित केल्या होत्या तसेच मुलींची रनिंग स्पर्धा सोबतच खो-खो चे आयोजन करण्यात आले होते संगीत खुर्ची सुद्धा आयोजित करण्यात आली होती अशा विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या सरते शेवटी ज्या विद्यार्थ्यांनी टूर्नामेंट मध्ये विशेष प्राविण्य दाखविल्याबद्दल ज्या संघाचा विजय झाला त्यांना सरते शेवटी संस्थेच्या वतीने मानचिन्ह व त्यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली

إرسال تعليق