आदर्श ज्ञानपीठची शैक्षणिक व आध्यात्मिक यशस्वी सहल

    जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी "अवनिश ऍग्रो टुरिझम अँड अम्युजमेंट पार्क" येथे शैक्षणिक,  मनोरंजनात्मक व आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्याथ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदविला.

    सहलीची सुरुवात शाळेचे सदस्य कवीश्वर सिंह राजपूत, मुख्याध्यापिका, सौ अनिता पळसकर, पर्यवेक्षिका तसेच शिक्षिकेच्या हस्ते लाल परिचे औक्षण, पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या सौ अनिता पळसकर व सर्व शिक्षकवृंद यांनी माँ सरस्वती माता, शाळेच्या संस्थापिका स्वर्गीय विजयाबाई राजपूत मॅडम तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन सहलीचा शुभारंभ केला. विद्यार्थी लालपरी बस द्वारे हसत खेळत आनंदात प्रवासाचा आनंद घेत अवनीश ऍग्रो टुरिझम व अम्युजमेंट पार्क येथे पोहचले. सहलीचे ठिकाण पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह व तेज स्पष्टपणे झळकत आला. विद्यार्थ्यांची एनर्जी कायम टिकून ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी उत्तम लज्जतदार चविष्ट अश्या नास्त्याचा आस्वाद घेतला व आपला मोर्चा वॉटर ऍक्टिव्हिटी आणि अम्यूजमेंट पार्क कडे वळविला. तेथे सर्व शिक्षक वृंद  गटनिहाय सर्व विद्यार्थ्यांचे सर्व खेळ होतील याकडे लक्ष केंद्रित करून होते तर 25 विद्यार्थ्यांवर एक असे मार्गदर्शक अवनीश ऍग्रो टुरिझम तर्फे देण्यात आले होते. सर्व मनोरंजनात्मक खेळ खेळून होताच सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेनुसार आदर्शच्या संस्काराला धरून "वदनी कवळ घेता...." नामघोषणात  स्वादिष्ट चविष्ट रुचकर अशा जेवणाचा उत्तम आस्वाद घेतला. उदरभरणचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

तोवर सूर्य माथ्यावर आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा अडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज कडे वळविला. रोलर कोस्टर,वॉटर स्लाइट्स, जायंट व्हील,ब्रेक डान्स, रेन डान्स,फोम डान्स, ड्रॅगन राइट्स आधी खेळ विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह अनुकरणीय स्वरूपात दिसून येत होता. विद्यार्थ्यांची एनर्जी कुठेही कमी न होऊ देण्यासाठी खेळून झाल्याबरोबर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. सूर्य मावळतीला येताक्षणी सर्व विद्यार्थ्यांनी स्वप्नपूर्ती झाल्याची आशा मनी बाळगून छोट्या छोट्या नैनांमध्ये आठवणी साठवून अवनीश ऍग्रो टुरिझम ला अलविदा केले.

               शिक्षणाला संस्काराची जोड या आदर्श ज्ञानपीठच्या तत्त्वाप्रमाणे परतीच्या वाटेवर शेगाव रोडवरील अन्नकुटी येथे सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत  महाबली बजरंग बली यांच्या नामघोषणाचा महायज्ञ, हवन गुजरात येथील महाराजांच्या हस्ते करण्यात आला होता,  आदर्श ज्ञानपीठच्या विद्यार्थी न चुकता दर मंगळवारी व शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करतात त्याचीच फलश्रुती म्हणून साक्षात भगवंताने हा योग घडवून आणला विद्यार्थ्यांनी शिस्तीत हनुमान चालीसाचे पठण करत यज्ञकुंडाचे दर्शन घेऊन, गुरुजींचा आशीर्वाद घेऊन मोतीचूरचा लाडू प्रसादरुपी ग्रहण करून तसेच भोजन प्रसाद घेऊन एकाच सहलीत शैक्षणिक आणि आध्यात्मिक अनुभव घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी "अनंत कोटी  ब्रम्हांडनायक....."गजरात परतीची वाट धरली.

           संपूर्ण सहल शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात आल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पळसकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांची योग्य व सतत देखरेख केली सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त सहकार्य सामाजिक जाणीवा तसेच वेळेचे नियोजन यांसारख्या महत्वपूर्ण मूल्यांची वृद्धी होण्यासाठी मदत मिळाली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययनातील ताणतणावातून मुक्त होऊन नवचैतन्य प्राप्त झाले. पुनश्च एकदा संस्था पालकांच्या विश्वासास पात्र ठरली. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही सहल संस्कारमयी, उपयुक्त आनंददायी व संस्मरणीय ठरली सहलीच्या यशस्वी ते करिता संस्थेचे सदस्य कविश्वरसिंह राजपूत व मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत, ज्येष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

أحدث أقدم