खामगाव नगरपरिषदेत स्विकृत नगरसेवक म्हणून सुपरिचित जगदीश अग्रवाल यांना घेण्यासाठी पत्रकारांसह विविध संघटनांची मागणी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - खामगाव शहराचा संपूर्ण अभ्यास व जनतेच्या हिताची जाण असलेले सुपरिचित वरिष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांना खामगाव नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यासाठी पत्रकारांसह विविध संघटनांनी कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्याकडे मागणी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे जगदीश अग्रवाल हे उच्चशिक्षित असून त्यांना कायद्याचेही परिपूर्ण ज्ञान आहे.
जगदिश अग्रवाल यांना नगर परिषदेच्या माध्यमातून जनकल्याणाच्या सामाजिक सेवेत आपली कर्मपूजा समर्पित करण्याची ईच्छा आहे. जगदिशजी हे लोकनेते स्व. भाउसाहेब फुंडकर यांच्या ध्येयवादी मार्गदर्शनाने प्रेरित होऊन समाजसेवेत सक्रिय आहेत. गेल्या ४५ वर्षापेक्षा अधिक काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. सोबतच ४० वर्षापासून पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य, सहकार, अशा विविध क्षेत्रात सेवेच्या अभिनव उपक्रमांनी समाजसेवक म्हणून सिध्द झालेले आहेत. पत्रकारितेतून त्यांनी नुसता खामगाव तालूका आणि बुलढाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासाला पोषक ठरणाऱ्या लिखानाची बांधिलकी पार पाडलेली आहे.
अशा विधायक विचारांच्या सेवाभावी व्यक्तीमत्वाला खामगाव शहराच्या गतिमान विकासकार्यात सेवेची संधी द्यावी. यासाठी विविध पत्रकार संघटना, अग्रवाल समाज संघटना यासह व्यापारी बांधव यांनी कामगार मंत्री ना.आकाश दादा फुंडकर यांच्याकडे मागणी केली आहे. आकाश दादांनी सदर मागणी पूर्ण करावी अशी असंख्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Post a Comment