आदर्श ज्ञानपीठ प्रजासत्ताक दिनी देशभक्तीत रंगले
घाटपुरी नाका परिसरातील माता सरस्वतीच्या मंदिरा जवळील "शिक्षण इंग्रजीतून पण संस्कार मातृभाषेतून" या ब्रीदवाक्य नुसार विद्यार्थ्यांना घडवणारे ज्ञानपीठ म्हणून नावारूपास आलेले आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खामगाव येथे देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. रजनीदेवी मोहता मॅडम तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री कन्हैयासिंह राजपूत सर, सदस्य कविश्वरसिंह राजपूत सर कृष्णा,राठी सर, जितेंद्र जैन सर ,गणेश म्हात्रे सर शाळेच्या प्राचार्या अनिता पळसकर मॅडम, पर्यवेक्षिका राजपूत मॅडम ज्येष्ठ शिक्षिका महाजन मॅडम यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी सन्माननीय विनोदजी डिडवाणीया सर सत्कारमूर्ती म्हणून लाभले यांचे व उपस्थित मान्यवरांचे वेळोवेळी आदर्श ज्ञानपीठ च्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे सहकार्य लाभत असते. डिडवाणीया सरांच्या समाजकार्यांची व विद्यार्थ्यांप्रति असलेल्या आपलेपणाची व सहकार्याची दखल घेऊन संस्थेने संस्था अध्यक्ष कन्हैयासिंह राजपूत सर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाल व श्रीफळ देऊन विनोदजी डिडवाणिया सरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रजनीदेवी मोहता मॅडम व मान्यवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आली नंतर राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत व संविधान वाचन करून देशभक्तीपर नारे देण्यात आले. यानंतर आदर्शच्या परंपरेनुसार दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच संस्थेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन मॅडम यांनी मान्यवरांचे भारतीय परंपरेनुसार औक्षण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संविधान मूल्य, शिस्त व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गीते ,भाषणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. भारतीय संविधानाचे महत्त्व व नागरिकांचे कर्तव्य यावर विद्यार्थ्यांनी विचार मांडले. मुलांनी अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात म्युझिकल कवायत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अक्षया इरतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. काजल होणवलकर यांनी केले तर संविधान वाचन सौ. सारिका सरदेशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कवीश्वरसिंह राजपूत सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिन व संविधान मूल्ये यांचे भावी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले तर कार्यक्रम अध्यक्षा सौ. रजनी मोहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला व देशभक्तीपर नाऱ्यांच्या गर्जनेत आदर्श ज्ञानपीठ देशभक्तीत रंगून गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता, प्राचार्या सौ. अनिता पळसकर, पर्यवेक्षिका सौ .प्रियंका राजपूत, ज्येष्ठ शिक्षिका ममता महाजन, आदर्श ज्ञानपीठाचे सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्ग आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.





Post a Comment