पदभार घेताच नगराध्यक्षा सौ.फुंडकर यांनी घेतली सर्व विभाग प्रमुखांची बैठक
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव(नितेश मानकर):- पालिकेचे सूत्र हाती घेताच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अपर्णा फुंडकर यांनी कामांचा श्रीगणेशा केला. त्यांनी सर्वप्रथम नगर परिषदे मधील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. सगळ्यांशी परिचय करून घेतला. सध्या काय कामे सुरु आहेत.त्यानी कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. कोणत्या विभागात कोणती कामे होत असतात याचीही इतमभूत माहिती जाणून घेतली. यानंतर कशी कामे अपेक्षित आहेत याबद्दल सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्यात. त्यांच्या या वेगळ्या शैलीमुळे शहरातील विकास कामे आता अधिक गतिमान होणार आहे अशी अपेक्षा करणे वाजवी ठरेल.

إرسال تعليق