खामगाव चा विकास: रस्ता झाला नदीमय !
अमडापूर नाका ते डाळ फाईल रस्त्याची दयनीय अवस्था: रस्त्यावर पाणीच पाणी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजप ने नगरपालिका निवडणूक जिंकली मात्र अनेक ठिकाणी अजून विकास झाला नसून डाळ फाईलाच्या रस्त्याने नदीचे रूप धारण केले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून अमडापूर नाकाते डाळ फाईल हा रस्ता अर्धवट बनलेला आहे डाळ फाईल भागात तर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पाणी रस्त्यावर आले आहे त्यामुळे या रस्त्याने नदीचे रूप धारण केले असून वाहन तसेच पादचाऱ्यना या रस्त्याने जाणे अतिशय कठीण झाले आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासन तसेच नामदार फुंडकर यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment