अंजुमन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना डॉ. वकार उल हक खान यांच्या हस्ते बक्षिसे वाटप
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- अंजुमन इंग्लिश स्कूल, येथे क्रीडा सप्ताह ४ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान प्रदर्शनाने झाली आणि त्यानंतर इस्लामिक प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स तयार केली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजुमन मुफिदुल इस्लाम स संस्थेचे संचालक आणि प्राचार्य अहफाज उल हक यांनी केले. संपूर्ण आठवडाभर क्रीडा व स्पर्धां चे आयोजन करण्यात आले. २६ जानेवारी २०२६ रोजी अंजुमन मुफिदुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. वकार उल हक खान यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी खेळाडू आणि विद्यार्थ्यांना बक्षिसे, पदके, ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि बक्षिस चे वितरण केले. या कार्यक्रमात इंग्लिश स्कूलचे सीईओ अॅड जुबेर हाश्मी. अंजुमन हायस्कूल अण्ड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अहफाज उल हक खान, अंजुमन इंग्लिश स्कूल चे शाळेचे मुख्याध्यापक रेहबर खान व्यासपीठावर विराजमान होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. वकार उल हक खान म्हणाले की, शाळेत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि उत्कटतेने सहभागी होतात आणि त्यांची प्रतिभा दाखवतात. मी सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी तसेच मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आशा करतो की ते भविष्यातही त्याच आवडीने विद्यार्थ्यांना शिकवत राहतील तसेच खेळ आणि विविध कार्यक्रम आयोजित करतील. आता ज्या विद्यार्थिनी ने कुराण पठण सादर केले तिला मी विशेष बक्षीस देत आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक अब्दुल रहीम, शिक्षिका फरीदा अंजुम, शिक्षिका नगमा सोरौश आणि सर्व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले.


إرسال تعليق