रुग्णसेवेसाठी पुढाकार; रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे 12 जणांचे रक्तदान 


जनोपचार न्यूज नेटवर्क शेगाव :- रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप हा सदैव गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असलेला युवकांचा संघटित समूह आहे. वेळ, काळ आणि परिस्थितीची अडचण न पाहता रुग्णसेवेसाठी पुढे येणारे असंख्य तरुण या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर कुठेही रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास, त्याच ठिकाणी तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून केले जाते.

शेगाव सामान्य रुग्णालयात रक्तपुरवठा कमी झाल्याने रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या युवकांनी भोनगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वीराला यशस्वी करण्याकरिता ग्रुपच्या वतीने परिश्रम घेण्यात आले


Post a Comment

Previous Post Next Post