प्रेम नंतर लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय युवतीवर अत्याचार: ऑनलाईन तक्रारीनंतर कारवाई : आरोपी रोफूचक्कर

शेगाव : प्रेमाच्या गुटुर गु नंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप २३ वर्षीय युवतीने केला असून शेगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६९ अंतर्गत कायम अप. क्र. ९९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

जाहिरात

२३ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या २०२१ मध्ये अकोला येथे  शिक्षण घेत असताना तिची ओळख आरोपीशी झाली. आरोपीने विश्वास संपादन करून लग्नाचे आश्वासन दिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२२ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान शेगाव येथील एका लॉजमध्ये अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. आरोपीने विवाहास नकार दिल्यानंतर पीडितेने ऑनलाईन माध्यमातून तक्रार (CCINS) नोंदविली. त्याआधारे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم