लायन्स क्लब खामगाव संस्कृती व माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ३५० विद्यार्थिनींसाठी कर्करोग जनजागृती सत्र 

खामगाव:दिनांक 27.02.26 रोजी लायन्स क्लब खामगाव संस्कृती आणि माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील ३५० विद्यार्थिनींसाठी स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत (Breast & Cervical Cancer) विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवतींना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सोनल टिबडेवाल (MD Homoeopathy) यांनी केले. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर पडली असून त्यांच्यामध्ये आरोग्याप्रति एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.


प्रमुख उपस्थिती व मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी एम जाधव सर व कर्मचाऱ्यांच्या वतीने लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष PMJF लायन आकाश अग्रवाल, फर्स्ट लेडी व बुलेंटिन एडिटर ऑफ क्लब लायन सौ. शिल्पा आकाश अग्रवाल, क्लबचे सचिव लायन डॉ. निशांत मुखीया आणि प्रमुख मार्गदर्शिका लायन डॉ. सोनल टिबडेवाल यांचा सन्मान करण्यात आला.
नियोजन आणि व्यवस्थापन
या संपूर्ण उपक्रमाचे प्रकल्प प्रभारी (Project Incharge) म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव सर यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन समन्वयक श्री. मंगेश धर्माळ सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजकुमार धानुका सर यांनी आपल्या शैलीत पार पाडले.
या सत्राचा सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर दिसून आला असून, आरोग्यासारख्या गंभीर विषयावर उघडपणे चर्चा झाल्यामुळे सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

أحدث أقدم